Friday 5 September 2014

''आयुष्य घडवणारे सर........''

 आज ५ सप्टेंबर , अर्थात शिक्षक दिन …. आपल आयुष्य घडवणारे असे  खूप कमी शिक्षक असतात.  अशाच माझ आयुष्य घडवणाऱ्या माझ्या सरांना माझ हे छोटस गिफ्ट ……. 

आदरणीय चौधरी सर,
                  दीड - दोन वर्षांपूर्वी तुमच्याशी शेवटची प्रत्यक्ष भेट झाली. म्हणजे साधारणत:२०१२ मध्ये. त्यानंतर आज हे पत्र लिहिण्याचा योग येतोय ! ( आणि माझा पुरता गोंधळ उडालाय कि काय लिहू !)
                 माझ्या मते आमची batch २०१० ते २०१२ या वर्षांत तुमच्याकडे होती आणि खरच या वर्षांत तुम्ही आमच्यासारखी उनाड पोर सुधरवलीत! अर्थात तुमच्या हाताखालून अशा अनेक batch गेल्या आहेत आतापर्यंत आणि त्यामुळे तुम्हाला आमच्यासारखे अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनी भेटले असतील. पण खर सांगू का सर , आम्ही तुमच्या सारखे सर कधीच बघितले नव्हते तुम्हाला भेटण्या आधी .
            माझी '' शिक्षक '' या व्यक्तीची साधी सोपी व्याख्या म्हणजे ' विद्यार्थ्यांना खूप बडवून काढणारा आणि यंत्रासारखा , पुस्तकी ज्ञान देणारा कुणीतरी !' अशीच होती पूर्वी . त्यामुळे अकरावीला जेव्हा मी '' एन्झो -केम'' मध्ये admission घेतल तेव्हा मी थोडी धास्तावले होते कि इथले शिक्षक कसे असतील ? आणि असे बरेच प्रश्न होते मनात. पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हि सगळी भीती ' छूमंतर' झाली !
              सर, विद्यार्थी आपल्या शिक्षकांचं अनुकरण करत असतो अस म्हणतात . त्यामुळे शिक्षकांची स्वत:ची वागणूक चांगली असण खूप गरजेच असत. तुमची वागणूक चांगली असावी या बद्दल तुम्ही नेहेमीच दक्ष होतात. आम्ही विद्यार्थी नव्हतोच तुमच्यासाठी कधी, तुमच्या मुलांसारखी वागणूक मिळाली आम्हाला तुमच्याकडून नेहेमी.
          एका शिक्षकाने विद्यार्थ्याला कस शिकवायचं हे तुमच्या कडून शिकावं कोणीही! तुम्ही वर्गात आले म्हणजे आज काहीतरी नवीन , वेगळ शिकायला भेटणार हे माहिती असायचं आम्हाला. तुमचा विषय account आणि s.p. होता , पण हे दोन विषय शिकवताना तुम्ही आम्हाला इतर किती विषयांच शिक्षण दिलत हे शब्दात सांगता येणार नाही. जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेशी जोडलत तुम्ही. व्यावसायिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना गरजेच असत हे तुम्ही समजावून सांगितल होत. तुमच्या या शिकवण्याच्या हातोटीमुळे आज आमचे तुम्ही शिकवलेले विषय पक्के झालेत.
                तुमच्याकडे अजून एक कला आहे ती, विद्यार्थ्यांमध्ये  मिसळण्याची आणि त्यांना एक मित्र म्हणून समजून घेण्याची ! तुमच्या या गुणांमुळे आम्हाला तुमची भीती कधीच वाटली नाही. आदर, विश्वास होता . पण भीती नव्हती. कारण आम्ही चुकल्यावर तुम्ही आम्हाला समजावून सांगितलत नेहेमी . तुम्ही रागावलेत किंवा ओरड्लेत अस मला तरी आठवत नाही .
               कॉलेज कॅम्पस मध्ये मित्र - मैत्रिणींसोबत गप्पा माराव्यात तश्या गप्पा सुद्धा आम्ही तुमच्या सोबत मारल्या आहेत आणि या प्रत्येक वेळा तुम्ही आमच्या पेक्षा मोठे आहात हे कधीच जाणवल नाही आम्हाला.
            तुम्हाला आठवत का सर ? तुम्ही आम्हाला एक स्वप्न पाहायला शिकवलं; ' आम्ही जेव्हा मोठे होऊ , मोठ्या पदावर जाऊ तेव्हा आम्हाला परत या कॉलेज मध्ये यायचय , आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचय.'…… आम्ही अजून हे स्वप्न बघतो आहोत सर . ( आणि एक दिवस ते नक्की पूर्ण होईल)
           हे सगळ बोलताना माला एम.पी. गायकवाड आणि एस.मढवई सरांना विसरून चालणार नाही कारण तुम्हा तिघांचाहि समान वाटा आहे आम्हाला घडवण्यात. तुमच्या मुळे आम्हाला आमच ध्येय ठरवता आल. तुम्ही तिघंही आमच्यासाठी '' आदर्श शिक्षक'' आहात .
             तुमच्यासारख्या शिक्षकांच्या  हाताखाली आम्ही घडलो याचा आम्हाला आज अभिमान वाटतो. पण खंत सुद्धा वाटते कि पुढच्या आयुष्यात आम्हाला असे शिक्षक परत नाही भेटणार. पण पुढच्या अनेक batch चे तुम्ही तीघ नेहेमी आवडते शिक्षक राहाल अशी खात्री आहे मला.
          खरतर तुमच्या बद्दल जितक लिहाव तितक थोडच आहे.त्यामुळे पत्राला इथेच पूर्णविराम देते आता !
                             
                                                                                                              तुमची एक विद्यार्थिनी,
                                                                        

Thursday 26 June 2014

''वास्तवाच दर्शन घडवणाऱ्या मालिका….''

            टी.व्ही. म्हंटल कि बातम्या, चित्रपट, आणि सिरीयल या गोष्टी ओघाने येतातच. आणि त्यात हि या टि.व्ही. सिरीयल चा नंबर एक असतो. जवळ जवळ सगळ्याच घरातला महिला वर्ग या मालिकांचा चाहता आहे. मग ती मालिका हिंदी असो वा मराठी ! या मालिका बघताना घरातले लोक ( जास्त करून महिला ) इतके तल्लीन होतात कि काही वेळा हे सगळ आपल्या घरात घडत आहे, असे  त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असतात !
           आश्चर्य म्हणजे या सर्व मालिकांची कथा थोड्या-थोड्या फरकाने सारखीच असते. तीच सासू-सुनांची भांडण, तेच खलनायकांचे कट कारस्थान,तेच लग्नात नटल्या सारखे घरात नटून वावरणे , मग कधी तरी यात बदल म्हणून नवऱ्याचे लग्ना व्यतिरीक्तचे संबंध, पुनरजन्म आणि तेच सगळ! मला तर प्रश्न पडतो कि वर्षानुवर्ष चालत राहणाऱ्या ( एकाच साच्यातून निघालेल्या ) मालिका बघताना लोकांना कंटाळा येत नसेल का?
          समजा येतच असेल कंटाळा , तरीही दिग्दर्शकाला, कथा लेखकाला शिव्या-शाप घालून पुढे या मालिका तशाच बघत राहणारे लोक सुद्धा  खूप दिसतात ! खर म्हणजे अशा मालिकांबद्दल हव तेवढ लिहिता येईल. पण आज हा विषय थोडा बाजूला ठेवावासा वाटतोय.
            त्यामागच कारण सुद्धा तसच आहे. दोन दिवसांपूर्वीच एक नवीन टि.व्ही.channel सुरु झाल आहे. '' Zee Zindagi''. channel नवीन सुरु होणार म्हंटल्यावर त्याबद्दल थोडी उत्सुकता होतीच मनात ! आणि या channel ची जाहिरात करतानाच यावर सीमेपलीकडच्या कथा दाखवणार आहेत हे हि जाहीर झाल होत. त्यामुळे आता या सीमेपलीकडच्या कथा नेमक्या काय आणि कशा आहेत जाणून घ्यायची सुद्धा इच्छा होतीच.
             या सगळ्या उत्सुकते मुळेच हे channel बघण्यात आल. आणि माझ्या मते मालिकांच्या कथांचे सगळेच विषय वेगळे निवडल्याने बऱ्याच  दिवसांनी ''सास-बहु'' च्या मालिकांपेक्षा वेगळ काहीतरी बघायला मिळाल्याचा आनंद सुद्धा झाला.
                  '' जिंदगी गुलजार हैं'' आणि '' कितनी गिरहे बाकी हैं '' सारख्या या channel वरच्या मालिका आजच्या वास्तवच दर्शन करून देणाऱ्या आहेत अस म्हणायला हरकत नाही. '' जिंदगी गुलजार हैं'' या मालिकेतून गरिबीशी झगडत आयुष्य काढणाऱ्या तीन बहिणींची आणि त्यांच्या आई ची गोष्ट आपल्या समोर येते. तर '' कितनी गिरहे बाकी हैं'' या मालिकेतून वृद्धांचे  एका वेगळ्या नजरेने अनुभवलेले किस्से किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या पुढे उभ्या करण्यात आलेल्या आहेत. ( किरण खेर यांच्या भाषेत सांगायचं झाल तर : '' एक अलग नजर और नजरीयेसे औरत के जिंदगी कि कहाणी'') समाजासोबत, आणि वेळ पडल्यास आपल्या परिवारासोबत झगडून स्वत:साठी जगणाऱ्या या महिलांच्या गोष्टी दाखवताना किरण खेर एक वाक्य वापरतात.- '' कितनी गिरहे खोली हे हमने, कितने गिरहे बाकी हैं ?'' खरतर हा प्रश्नच आहे आपल्या सगळ्या महिलांसाठी कि समाजाने लादलेल्या नियमांच्या किती गाठी आपण सोडवल्या आहेत आणि अजून किती गाठी सोडवायच्या बाकी आहेत ? वास्तवच दर्शन करून देणाऱ्या या मालिकांमधील संवाद खरच ऐकण्यासारखे आहेत. स्त्रियांचा आत्मसन्मान जगवणाऱ्या कथा, कुठेही नाटकी अभिनय न वाटता वास्तव वाटावा असा परिवार आणि त्यांची राहणीमान, कथेचा रटाळपणा टाळून कथानकाने घेतलेली पकड, विषयाचा वेगळेपणा ( कितनी गिरेह  बाकी हे मधील जेष्ट नागरिकांच्या एकाकी जीवनाचा विषय -आई वडिलांसाठी आता जसा तुमच्याकडे वेळ नाही  तसा आता त्यांच्याकडेहि वेळ नाही उरला ,डोळे  पैलतीरी लागलेत, त्यांना वेळ द्या, नाहीतर पस्तावाल -नवा विषय नवा मुद्दा आहे न ), कुठेही सेट वाटू नये अस घरगुती  वातावरण , या सर्व जमेच्या बाजू या मालिकांना प्रेक्षक प्रिय करतील यात शंका नाही .
                 अर्थात या channel वर सगळेच गंभीर विषय घेतले आहेत असे  नाही. ''ओन-झारा'' सारखी हलकी फुलकी कॉमेडी मालिकाही आपल्याला इथे बघायला  मिळते.
                 खर म्हणजे हे सगळ सांगण्याचा माझा एवढा हट्ट का? असा प्रश्न नक्कीच पडेल. पण आपल्या नेहेमीच्या त्याच त्या मालिकांच्या कथांतून बाहेर येउन काहीतरी वेगळ, वास्तवाची जाणीव करून देणार काही आपल्या महिला वर्गाने ( आणि अर्थातच सगळ्यांनी )पहाव हि प्रामाणिक इच्छा या मागे आहे.
              एकदा तरी या मालिका बघायला तुमची सुद्धा काही हरकत नसेल, नाही का ?           
             मी तर एव्हडी प्रभावित झालेय कि पहिल्या दोन भागातच मला हा लेख लिहावासा वाटला. यातच सगळ आल न!




















Sunday 12 January 2014

Banners... !

          हाय फ्रेंड्स, whats going on? hows life going? बरेच दिवसात काही पोस्ट केल नाही ब्लॉगवर ( कि महिने!) म्हणून हाक - हवाल विचारले आधी तुमचे ! तुम्हाला सांगते फ्रेंड्स माझ्यासारखी moody मुलगी कुठेच सापडायची नाही तुम्हाला! मी स्वत:च माझ्याबद्दल अस बोलतेय, पण हेच खर आहे. So, काही लिहायचा mood असला तर मी लिहायला सुरुवात करे पर्यंतच माझा mood जातो आणि मग मला लिहायचा जाम कंटाळा येतो ! त्यामुळे एवढ्या दिवसांत मनात खूप विषय असून पण लिहून नाही झाल काहीच. असो. ( एवढे गोडवे काय गायचे स्वत:चे )
             खरतर आजपण लिहायला भारी topic भेटला नसता तर आजपण असाच आळशीपणा केला असता मी ! topic तसा साधाच आहे. Banner. खूपच वाढलय हे bannersच फॅड !
            हो, आता तुम्ही लगेच म्हणाल कि त्यात काय नवीन सांगतेय हि? सगळीकडेच असतात. तर फ्रेंड्स हे मलापण माहितीय कि bannersसगळीकडेच लावलेले असतात. म्हणजे या banners च प्रमाण  इतक वाढलंय आता कि कोणाचा वाढदिवस असो कि मग लग्न कुठल्याही कारणांसाठी आता banners लावतात!(पूर्वी सारख फक्त मोठ्या नेत्यांचे banners लावायची पद्धत आता कधीच गेली !) या bannersसाठी मध्ये बरेच नियम काढले होते. पण ते तेव्हाच धाब्यावर बसवले गेले आणि आपल्याला असे banners बघायची सवय झाली !( गल्लो-गल्ली आणि प्रत्येक भिंतीवर असे banners लावलेले दिसतात आता. ) 
             Ok, let me explain कि मी आज हे अस अचानक banners बद्दल का बोलतेय! त्याच काय झाल कि मी सकाळी college ला निघाले होते आणि आमच college गावातल्या चौफुली जवळ आहे तर चौफुलीवर नेहेमी काही न काही banners लावलेले असतात. आणि मला आतापर्यंत क्त माणसांच्या वाढदिवसाचे banners बघायची सवय होती. पण कुत्र्याच्या वाढदिवसाचा banner म्हणजे जरा अतीच नाही का होत हे फ्रेंड्स ? 
           मला मान्य आहे कि तुमचा कुत्रा तुमचा लाडका असेल पण म्हणून मग त्याच्या वाढदिवसाचा banner लावायचा ! एवढा - तेवढा पण नाही तर चांगला मोठा  banner. '' Maggi ताईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'' (  सोबत या  Maggi ताईनचा मोठा फोटो होता हे सांगायला नको !) आणि खाली शुभेच्छुक म्हणून काही कुत्र्यांची नाव आणि फोटो होते . ( त्या कुत्र्यांची नाव समजली नाही, नाहीतर ती पण लिहिली असती ! ) 
          या bannersच फॅड किती वाढलंय याचा विचार सुद्धा करू शकत नाही आपण. खरतर हा प्रकार खूप हास्यास्पद आहे कि आजकाल असे प्रकार सुद्धा घडतात. पण मला वाटत कि या प्रकाराकडे आपण थोड गंभीर पणे बघायला हव कि हे bannersच लोन आपल्यात किती जास्त प्रमाणात पसरत आहे . 
         म्हणजे उद्या घराबाहेर पडल्यावर तुम्हाला कोणाचा कसला banner बघायला मिळेल ते सांगताच येत नाही!