माझ्या बद्दल थोडस ……

नमस्कार मित्र - मैत्रिणींनो ,
                                        खर म्हणजे ब्लॉग सुरु करून खूप दिवस झालेत . पण स्वत: बद्दल अजून काहीच लिहील नाही मी . म्हंटल आज लिहाव काहीतरी . खरा म्हणजे मी अजून इतकी मोठी नाही झाले कि स्वत: बद्दल काही लिहीन पण म्हंटल माझ्या रीडर्सना माझ्या बद्दल काही तरी माहिती हवी. म्हणून हा खटाटोप आहे. तस मला माझ्या बद्दल बोलायला मुळीच आवडत नाही .
                       तर मी कु. राखी राजेंद्र राजपूत. सगळ्यांची असतात तस माझ पण टोपण नाव आहे . अपूर्वा . आणि जास्त करून सगळे मला त्याच नावाने ओळखतात . मी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी राहते . सध्या मी वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला आहे . खरतर आता प्रथम वर्ष संपलय अस म्हणायला हरकत नाही. खरतर मी खूप मुडी आहे . आणि  त्यामुळे मला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत असा खूप आग्रह असतो माझा . कुकिंग , विणकाम - शिवणकाम असो कि मग अजून काही असो . तसे छंदही खूप आहेत माझे , वचनाच अफाट वेड आहे अस म्हंटल तर वावग नाही ठरणार .……माझ्या बद्दल अजून सांगायचं झाल तर मी खूप बडबडी सुद्धा आहे. त्यामुळे मला कोनात एड्जेस्ट व्हायला त्रास नाही होत.
                      मी ब्लॉग लिहीन अस कधीच नाही वाटल मला अचानकच तन्वी ताईचा  'सहजच ' ब्लॉग वाचला आणि वाटल आपण ही  लिहाव काही तरी. मला नाही माहिती कि मी कस लिहिते. पण मला लिहायला आवडत एवढ मात्र नक्की . काही काही लेख वृत्तपत्रातही येतात.
                      अजून काही खास अस माझ्या बद्दल सांगण्यासारख काही नाही आहे. तुम्हाला माझा ब्लॉग वाचायला आवडेल अशी आशा करते. 

2 comments: