Friday 16 March 2018

It happes only in india

ईट हैपेन्स ओन्ली ईन इंडिया अस आपण म्हणतो ते उगीच नाही याचा प्रत्यय कुठे न कुठे येतच राहतो आपल्याला. आत्ताच असा एक प्रसंग घडला आणि पुन्हा वाटल की हे आपल्याकडेच होऊ शकत फक्त!
2 दिवसाची सुट्टी म्हणून आज गावाकडे निघाले. निज़ामाबाद-पुणे पॅसेंजरचा तसा हा नेहेमीचा प्रवास. आणि चढायचा डब्बा पण ठरलेलाच. अर्थात बाकी डब्यांना गर्दी फार त्यामुळे नेहमीच लेडीज़ डब्यात बसायची सवय झालीय. पण आज प्रवास करताना हा लेडीज डब्बाच का? असा प्रश्न पडला. एक 'भला' माणूस लेडीज डब्यात बसलेला दिसला तेव्हा बाहेर उभ्या काही कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या सारख्या थोडा फार कायदा जाणून असलेल्यानी त्याला उतरायला सांगितले. पण भल्या गृहस्थाने मी पोलिस आहे माला पण समजत अस सांगून सगळ्यांना गप्प तर बसवलच पण जागचे हलले सुद्धा नाही! त्या वर त्यांचे असे पण मत त्यांनी मांडले की, " काय हरकत आहे सगळ्या महिलांमधे एक पुरुष असायला, चांगल वाटत कधी कधी!!" त्याचं हे बोलण ऐकून आवक झाले मी. स्वत:ला पोलिस म्हणवून घेणारे हे महाशय अस कस बोलू शकता? आणि याही पेक्षा जास्त म्हणजे पोलिस आहेत तर यांना नियम माहित नाहीत का? एक पुरुष महिला डब्यात बसलेला बघितल्याने त्याच्या सारखे अजुन 4-5 भले गृहस्थ डब्यात चढले ते वेगळेच. पण खरा राग आणि आश्चर्य वाटल ते त्या पुरुषाच्या विचारांच ज्याला महिला डब्यातून प्रवास करताना आणि तिथे बसलेल्या महिलांशी घसट करताना काहीच गैर वाटत नाही! ही झाली आत्ताची गोष्ट पण रात्री जेव्हा महिला मूली एकट्या म्हणून लेडीज डब्यातुन प्रवास करत असतील तेव्हा त्या डब्यात बसणाऱ्या अशा भल्या पुरुषांना जाब कोणी विचारायचा? तेव्हा पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतोच ना? स्त्री-पुरुष समानता आम्ही पण मागतोच की पण मग त्या समानतेच्या नावा खाली जबरदस्तीने किंवा स्वतःकडे असलेल्या अधिकारांच्या जोरावर हव ते वागण्याची मुभा मिळते असा अर्थ आहे का? मी सगळ्याच पुरुषांना चुकीच किंवा वाईट ठरवत नाहीच आहे. पण जे चुकीचे आहेत त्यांच्यावर पांघरुण सुद्धा घालता येण्यासारख नाही हेही खरच.

1 comment:

  1. You know who I am hence posting as anonymous. Why you are blocking me everywhere??? Are you scared of your past???

    ReplyDelete